स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने अहोरात्र काम करणारी एक विश्वसनीय संस्था म्हणून ‘टिम यशोरथ टेस्ट सिरीज फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन’ अतिशय कमी कालावधीत उदयास आलेली ही एक अग्रगण्य संस्था आहे.
ही संस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा, गट (ब) आणि (क) तसेच आयोगाच्या इतर वर्ग (अ) आणि (ब) च्या परीक्षा, इतर सरळसेवा परीक्षा, त्यासोबतच TCS आणि IBPS कंपनीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सर्व परीक्षा, पोलीस भरती, सर्व प्रकारच्या डिफेन्स म्हणजे संरक्षण विभागातील परीक्षा अशा विविध परीक्षांचे परीक्षाभिमुख सराव पेपर अकॅडमीच्या नावाने तयार करून देते.
यशोरथ टेस्ट सिरीज परीक्षांचे तंत्र
बदलत्या परीक्षांचा ट्रेंड विचारात घेऊन अहोरात्र सराव पेपर स्पष्टीकरणासह तयार करण्याचे काम 24X7 तास चालू असते.
संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ही संस्था नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार स्टडी मटेरियलचा वापर करून अचूक प्रश्नपत्रिका अकॅडमीच्या नावाने स्पष्टीकरणासह तयार करून देते. संस्थेचे काम व्यक्ती केंद्रित नसून एक टिम वर्क म्हणून ही संस्था काम करते. संस्थेकडे मुबलक मनुष्यबळ व स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. तत्पर सेवा देणे ही संस्थेची आजवरची खरी ओळख आहे.
टिम यशोरथने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम करताना दूसरा एक महत्वपूर्ण स्तंभ उभा केला आहे तो म्हणजे खात्यांतर्गत पीएसआय परीक्षांचा. या माध्यमातून संस्था महाराष्ट्र राज्यातील खात्यांतर्गत पीएसआय परीक्षेची तयारी करणाऱ्या पोलीस बांधवांना मार्गदर्शन करण्याचे देखील काम करते. तसेच पोलिस बांधवांना घरपोच बुकलेट पोहोच करण्याचे देखील काम करते.
संस्था Full Length आणि Topic wise सराव पेपर तयार करण्याचे काम करत असून स्पर्धा परीक्षेची कोणतीही परीक्षा असल्यास एक विश्वासाचे व्यासपीठ टिम यशोरथ ही संस्था बनली आहे.
हा प्रवास खडतर असला तरी प्रचंड मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य यामुळे तो दिवसेंदिवस सोपा वाटत आहे. आपण निश्चित संस्थेशी जोडल्यास टीम यशोरथ अहोरात्र आपल्याला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सहकार्य करण्यास कटिबद्ध राहील.
